ही कहाणी पुढे जमीन केव्हा दिसेल याची शाश्वती नसताना, अथांग सागरात झोकून देण्याची इच्छा, दुर्दम्य आशावाद, साहसे, संकटे, यशापयश यांची पर्वा न करणाऱ्या वेड्या पीरांची आहे!

मध्ययुगीन कालखंडातील जगाच्या शोधमोहिमा मुख्यतः युरोपामधूनच सुरू झाल्या. त्यातही पोर्तुगाल व स्पेन या दोन देशांचे वर्चस्व शंभर वर्षांपेक्षाही जास्त काळ टिकून होते. डच आणि ब्रिटिशांनी त्यात नंतर उडी घेतली. या सागरी शोधमोहिमांची सुरुवात कशी झाली, विस्तार कसा झाला, त्यातून जगाच्या वेगवेगळ्या भूभागांचे आणि सागरी मार्गांचे शोध कसे लागले व यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा यांचा आढावा घेणारे हे लेखन आहे.......